About Me
- Husain Qureshi
- Subject Teacher B.Sc, M.A., B.Ed SET PhD (Registered) Z P Urdu Upper Primary School, Kothali. Tq. Motala Dist. Buldhana. 443103 Mo. 9850155656 Email :- husainsir78692@gmail.com
Saturday, 21 October 2023
अल फलाह इंग्लिश कॉन्व्हेंट येथे पालक मेळावा संपन्न अलरय्यान मायनॉरिटी एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटी संस्था द्वारा संचालित अल फलाह इंग्लिश कॉन्व्हेंट आणि स्कूल ऑफ जीनियस अँड ज्युनियर कॉलेज मोताळा येथे पालक आणि शिक्षक मेळावा सोसायटीच्या अल्फा हॉल मध्ये यशस्वी रित्या पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल रायन सोसायटीचे अध्यक्ष हुसेन कुरेशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुर ग्रामपंचायत चे सरपंच डॉ अनीस शेख हे होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. इयत्ता सहावीचा विद्यार्थि शेख मुजाहिद शफीक जमादार याने तिलालत केली तर इंग्रजी भाषांतर सफवान आफरीद जमील याने सादर केले. त्यानंतर सर्व प्रमुखांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या मेळाव्यात पालक व शिक्षक यांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मनमोकळेपणाने चर्चा केली. समीउल्लाह सरांनी बैठकीच्या उद्देशाविषयी सविस्तर माहिती सांगितली. पालकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षक आणि व्यवस्थापनाचे प्रयत्नांचे कौतुक केले आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नवनवीन योजना तयार करून भविष्यात त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली इंगळे यांनी शाळेत सुरू असलेले शैक्षणिक उपक्रम व अध्यापनाची सविस्तर माहिती सादर केली. यासोबतच मुलांचे वर्तन आणि त्यांचा शालेय कार्यक्रमातील सहभाग याविषयी माहिती सांगण्यात आली. त्यानंतर कॉन्व्हेन्ट ची शिक्षिका नाहेदा शेख सिद्दीक मॅडम यांनी मुलांमध्ये शिस्त कशी लावावी, त्यांच्या टिफिनमध्ये दिले जाणारे जेवण, याविषयी सविस्तर सांगितले. नंतर ज़रीना मॅडम यांनी घरकाम, मुलांचे वर्तन कसे असावेत यावर माहिती देऊन पालकांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात उपस्थित असलेले रिजवान जमादार, शेख अनिस , शफिक जमादार, मौलाना अकबर साहब,मौलाना फिरोज़ आलम साहब , रिज़वान बेग राजुर,सईद कुरेशी यांनी आपले अनुभव, मुलांचा विकास आणि शाळेत दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत मनोगत व्यक्त केले व समाधान व्यक्त केले. आणि या गोष्टी इतर लोकांपर्यंत पोचवण्याचाही येतील असे सांगितले. त्यानंतर अध्यक्षीय भाषण मध्ये हुसेन कुरेशी यांनी मुलांच्या विकासातील पाच सूत्र मांडले. त्यांनी क्रेटीविटी, कॅरेक्टर व कॉन्फिडन्स चा एकमेकांशी संबंध जुळवून माहिती दिली. तसेच पालकांनी मुलांशी कसे वागले पाहिजे. ते उदाहरणांसह मांडले. ते म्हणाले की, "मुलाला ज्या पदावर जायचे आहे, त्याला जे बनवायचे आहे. त्याला लहानपणापासून त्याच पद्धतीने संबोधले जाऊ द्या. त्याला समान आदर द्या. जेणेकरून ते पद मिळवण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होईल." सदर मेळाव्यात मोताळा,बोराखेडी,राजुर,कोथळी, जयपुर आणि इतर येथील पालक सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नौशिन मॅडम व आएशा मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन वैशाली इंगळे मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी साठी शाळेतील शिक्षिका साजेदा परविन, सदफ मॅडम यांच्या सोबत सर्व शिक्षिकांनी खुप परिश्रम केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment